राज्यातील शाळा बुधवारपासून (१५ जून) सुरू होत असून राज्यातील सहा जिल्ह्य़ांतील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरिन्सगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
विदर्भ वगळून राज्यातील शाळा बुधवारपासून सुरू होत आहेत. शाळेचा पहिला दिवस हा राज्यात प्रवेशोत्सव करून साजरा करण्यात येतो. यावर्षी प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरिन्सगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सहा जिल्ह्य़ांची यासाठी निवड करण्यात आली असून या जिल्ह्य़ातील प्रत्येकी पाच विद्यार्थी या कार्यक्रमासाठी निवडण्यात येणार आहेत. निवडक शाळांमधील ३ मुले, २ मुली, त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्याच्या येरवडा भागातील लहुजी वस्ताद साळवे ई-लìनग स्कूलमधून दुपारी १ ते २ यावेळेत मुख्यमंत्री संवाद साधतील. नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, पुणे, ठाणे, लातूर या जिल्ह्य़ांमधील एकेक शाळा यासाठी निवडण्यात आली आहे.