पुणे शहराच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला आहे. शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री पुढील शुक्रवारी (१३ मे) पुण्यात बठक घेणार आहेत. शहरातील खासदार अनिल शिरोळे, सर्व आमदार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बठकीला उपस्थित राहणार आहेत.
महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मेट्रो, विकास आराखडा, रिंगरोड असे पुणे शहराशी निगडित अनेक प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी येत्या १३ मे रोजी बैठकीसाठी वेळ दिली आहे.
विधान भवन येथे ही बठक होणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, महापालिकेतील गटनेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार हेही या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बठक होणार असल्याने अनेक रखडलेल्या विकासकामांना आणि प्रकल्पांचा मार्ग मोकळा
होण्यास मदत होणार आहे. मेट्रो प्रकल्प केंद्राकडे प्रलंबित आहे तसेच शहराचा विकास आराखडा, जैववैविध्य उद्यान आरक्षण (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) हे विषय राज्य शासनाकडे आहेत.