मंचर, नारायणगाव, राहुरीतून आवक

पुणे : चवीला गोड असणाऱ्या गावरान चिकू चा हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्य़ातील मंचर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, नगर जिल्ह्य़ातील राहुरी, धानोरी भागातून मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात चिकूची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो चिकूची विक्री ५० ते ८० रुपये या दराने केली जात आहे.

Cash of ten and a half lakhs seized at Sangliwadi check post
सांगलीवाडी तपासणी नाक्यावर साडेदहा लाखाची रोकड जप्त
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
worth rupees 15 lakh Gutkha tranceport revealed during inspection on Kolhapur road
कोल्हापूर रोडवर तपासणीत १५ लाखाची गुटखा वाहतूक उघड
satara, accident, Tempo Plunges into Ravine, Two Severely Injured, Mahabaleshwar Pratapgad Ghat Road, 2 Rescue Workers, Hurt,
सातारा : महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर टेम्पो दरीत कोसळून चार जखमी

मार्केटयार्डात दररोज पंधराशे डाग चिकूची आवक होत आहे. आकारमानानुसार एका डागात साधारणपणे ८ ते ५० किलो चिकू बसतात. गावरान चिकूचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. जून महिन्यापर्यंत चिकूची आवक सुरू राहते. गावरान चिकूनंतर गुजरामधील चिकूची आवक सुरू होते. चांगल्या प्रतीच्या एक किलो  चिकूला ८० रुपये किलो असा दर मिळाला आहे. ऊन वाढल्यानंतर चिकूची आवक वाढते. गावरान चिकूचा आकार लहान असतो. चवीला अतिशय गोड असणाऱ्या गावरान चिकूला मागणी चांगली आहे, अशी माहिती फळबाजारातील चिकूचे व्यापारी साई फ्रूट एजन्सीचे राहुल संगेकार यांनी दिली.  डहाणू परिसरात घोलवड चिकूची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. घोलवड चिकूला मागणी चांगली असते,  असे त्यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योगांकडून चिकूला मागणी

गेल्या काही वर्षांपासून आइस्क्रीम उत्पादक अणि प्रक्रिया उद्योगांकडून चिकूला मागणी वाढली आहे. चिंचवड, वाई तसेच जेजुरी भागातील प्रक्रिया उद्योगांकडून चिकूला मागणी वाढली आहे.