News Flash

पुण्यात ३८५ बालकांचा ‘एमईएमएस’ रुग्णवाहिकांमध्ये जन्म!

राज्यात तब्बल ५ हजार ८५१ बालकांचा जन्म ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये झाला आहे.

राज्यात तब्बल ५ हजार ८५१ बालकांचा जन्म ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे यापैकी सर्वाधिक बालके पुण्यातली आहेत.
‘बीव्हीजी-एमईएमएस’ ही तातडीच्या वेळी रुग्णवाहिका पुरवणारी सेवा २६ जानेवारी २०१४ ला सुरू झाली. यात १०८ हा दूरध्वनी क्रमांक डायल केल्यावर रुग्णवाहिका पुरवली जाते. संस्थेतर्फे २८ नोव्हेंबर २०१५ पर्यंत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये झालेल्या प्रसूती व जन्मलेल्या बालकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत या रुग्णवाहिकांमध्ये जन्म घेतलेली सर्वाधिक- म्हणजे ३८५ बालके पुण्यातली होती. त्या खालोखाल या रुग्णवाहिकांमध्ये जन्मलेल्या बालकांच्या संख्येत सोलापूर (३६७ बालके), नाशिक (३३७), बीड (३३२) आणि औरंगाबाद (३२०) यांचा क्रमांक लागला आहे.
राज्यात या सेवेच्या ९३७ रुग्णवाहिका असून त्यातील २३३ रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक तर ७०४ रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक जीवरक्षक यंत्रणेची सुविधा उपलब्ध आहे. बाळंतपणाच्या वेळी रुग्णालयात पोहोचवण्याबरोबरच रस्ते अपघात, जळित अपघात, विषबाधा, हृदयविकार, अर्धागवायू अशा कोणत्याही आपत्कालीन कारणासाठी वैद्यकीय सेवा पुरवून नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जाते, अशी माहिती सेवेतर्फे देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:18 am

Web Title: childbirth in ambulance
Next Stories
1 अर्निबध नर्सरी शाळांचा पालकांच्या मागचा जाच कायम
2 – मंगल कार्यालये, लॉन चोरटय़ांचे लक्ष्य
3 – ‘कॉइनेक्स’ प्रदर्शन गुरुवारपासून तीन दिवस
Just Now!
X