25 November 2020

News Flash

शासनाविरोधात बालगृह चालकांचे दबावतंत्र

खोटी नावे दाखवून अनुदान लाटणाऱ्या आणि त्रुटी असलेल्या बालगृहांवर शासनाने कारवाईचे पाऊल उचलले

सनाथ मुलांना अनाथ दाखवून अनुदान लाटणारी बालविकास गृहे बंद करण्याच्या शासन निर्णयानंतर या संस्थाचालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महिला व बालकल्याण संचालनालयासमोर शनिवारी संस्थाचालकांनी आंदोलन केले.
पालक असलेल्या मुलांनाही अनाथ दाखवून त्यांच्या नावे अनुदान घेण्याचा प्रकार बालविकास गृहांमध्ये सुरू असल्याचे समोर आले होते. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. शासनाने केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली होती.
खोटी नावे दाखवून अनुदान लाटणाऱ्या आणि त्रुटी असलेल्या बालगृहांवर शासनाने कारवाईचे पाऊल उचलले. अशा संस्थांना नोटीस पाठवण्यात आली होती. या कारवाईच्या विरोधात आंदोलने करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे. बालविकास संस्था कर्मचारी संघटनेने याबाबत पुण्यात महिला आणि बालकल्याण संचालनालयासमोर आंदोलन केले.
शासनाकडून तपासणी करण्यात येत असल्यामुळे संस्थांचा छळ होत आहे. शासनाच्या निर्णयामुळे ७० हजार मुलांचा आधार जाणार आहे, असे आरोप संस्थाचालकांनी केले आहेत. ‘बालगृहे कोणत्याही प्रकारे बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. बालगृहांची तपासणी करणे आवश्यक आहे. ज्या संस्थांमध्ये त्रुटी आहेत, त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. मुलांचा त्यांच्या कुटुंबात राहण्याचा हक्क हिरावून घेऊन त्यांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
ही ७० हजार मुले अनाथ नसल्याची प्रशासनाला खात्री आहे. बालकांना त्यांचे नातेवाईक सांभाळण्यास तयार असूनही शिक्षणाचे कारण देत त्यांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे,’ असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण आयुक्तालयाने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:05 am

Web Title: children rehabilitation center trustee use pressure technique against the government
Next Stories
1 तिसऱ्या फेरीत सुमारे १० हजार विद्यार्थी बाहेर
2 झाकिर नाईकचे दिग्विजय सिंह यांच्याकडून उघड समर्थन!
3 पुणे विभागातील वीज यंत्रणेसाठी केंद्राच्या योजनेतून २१० कोटींची कामे
Just Now!
X