23 November 2017

News Flash

पुण्यात डोळ्यात मिरचीपूड टाकून पावणे सहा लाखांची रोकड लुटली

अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे | Updated: November 14, 2017 1:49 PM

ळ्यात मिरचीपूड टाकून अज्ञात चोरटा रोकड घेऊन पसार झाला.

पुण्यातील कर्वेनगर परिसरातील ताथवडे परिसरात भरदिवसा दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पाऊणे सहा लाखांची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश परदेशी हे सिंहगड रस्त्यावरील एका वाईन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. रविवारी वाईन शॉपमधील ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली होती. ती रक्कम घेऊन ते दुचाकीवरून कोथरुडला येत होते. यावेळी ताथवडे उद्यानाजवळ एकाने गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले. दुचाकी थांबवताच परदेशी यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अज्ञात चोरटा रोकड घेऊन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First Published on November 14, 2017 1:49 pm

Web Title: chilly powder attack and stolen cash in pune