News Flash

चिंचवड येथे रेल्वे रूळ ओलांडताना एकाचा मृत्यू, आत्महत्येचा संशय

जाधव यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते.

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील दळवी नगर झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या पुलाखाली रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा रेल्वेने धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सचिन बाबुराव जाधव (वय 33, रा रुपीनगर) अस रेल्वे अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-पुणे ही रात्री ८.३० ची लोकल जात असताना सचिन जाधव हे दळवी नगर येथील पुलाखालून रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळेस लोणावळा- पुणे या लोकलने सचिन जाधव याना जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वेची एवढी जोरात धडक होती की जाधव यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. विशेष म्हणजे जाधव हे मी चिंचवडला जाऊन येतो अस म्हटले होते. त्यामुळे ही घटना आत्महत्या तर नाही ना, असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस नाईक लोंढे हे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 7:30 am

Web Title: chinchwad railway station accident 1 dead pune
Next Stories
1 पक्षविरोधी काम करणार असाल तर पुन्हा माझ्या शेजारी बसू नका!
2 पिंपरीत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या भाजपसोबत ‘वाटाघाटी’
3 पुण्यात एका मतासाठी प्रशासनाचा खर्च सरासरी ८० रुपये
Just Now!
X