शहर सुधारणा समितीचा निर्णय
समाविष्ट करण्यात आलेल्या येवलेवाडी गावाचा प्रारुप विकास आराखडा तीन महिन्यात महापालिका प्रशासनाने तयार करावा, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा आणि तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर महापालिका हद्दीत येवलेवाडी गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने येवलेवाडी गावाचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. हा आराखडा तयार करुन त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात याव्यात, तसेच हा विकास आराखडा महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापयर्ंत तयार करावा, असा ठराव शहर सुधारणा समितीने केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधीर जानज्योत यांनी दिली.
प्रभाग रचनेवरही परिणाम
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा, तसेच महापालिकेत आलेल्या तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्यानंतर येवलेवाडी हे गाव महापालिकेच्या हद्दीत आले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजारच्या आसपास आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीनुसार महापालिका निवडणूक होणार आहे. सुमारे ६० हजार मतदार एका प्रभागात असतील. या गावाचा समावेश झाल्यामुळे प्रभाग रचनेवरही परिणाम होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 3:42 am