कारागृह अधिकाऱ्यासह रक्षकाला धक्काबुक्की

पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांत सुरू असलेल्या धुसफुशीतून एकमेकांना मारहाण करण्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी एका कैद्यावर दुसऱ्याने अणुकुचीदार वस्तूने हल्ला चढविला. त्यानंतर ज्या कैद्याला मारहाण करण्यात आली त्याच्या प्रतिस्पर्धी गटातील कैद्यांना बुधवारी मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यासह रक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

हडपसर भागातील हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंबीर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो कारागृहात न्यायाधीन बंदी (अद्याप शिक्षा न झालेला)आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास कारागृहातील कैद्यांना आवारात सोडण्यात आले. त्या वेळी हंबीर याच्यावर शाहरूक उर्फ रशीद शेख, अमन रियाज अन्सारी, सलीम शब्बीर शेख यांनी हल्ला चढविला. त्याच्यावर अणुकुचीदार वस्तूने हल्ला करण्यात आला. हंबीर जखमी झाल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल क रण्यात आले. हंबीरच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेख, अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास हंबीरच्या साथीदारांनी शेख, अन्सारी यांच्या गटातील साथीदार शाहरूख अस्लम खान याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या पाठीत वीट मारली. कारागृह अधिकारी संदीप एकशिंगे आणि शिपाई समीर सय्यद यांनी कैद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. एकशिंगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. या प्रकरणी राहुल तुपे, अक्षय हाके, अक्षय सूर्यवंशी, पृथ्वीराज सूर्यवंशी, गौरव जाधव, राहुल पानसरे, अक्षय चौधरी, अनिकेत जाधव, अक्षय इंगुळकर, संजय औताडे, अनिल सोमवंशी, शिवशंकर शर्मा, प्रवीण सुतार, निखिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैद्याला बेदम मारहाण; प्रकृती चिंताजनक

कैद्यांच्या एका गटाने बुधवारी सकाळी पुन्हा एका कैद्याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव महंमद नदाफ असल्याचे समजते. तो मूळचा सांगलीतील आहे. नदाफ याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.