News Flash

सीओईपीमधील करोना उपचार केंद्रात लसीकरणाचे नियोजन

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानात उभारण्यात आलेले मोठे करोना उपचार  केंद्र (जम्बो सेंटर) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे

संग्रहित छायाचित्र

सीओईपी केंद्र सुरू करण्याची घोषणा आढावा बैठकीनंतर

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानात उभारण्यात आलेले मोठे करोना उपचार  केंद्र (जम्बो सेंटर) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी करोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्य़ात लागू करण्यात येणाऱ्या प्रस्तावित र्निबधांबाबत आणि सीओईपी के ंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (५ मार्च) होणाऱ्या आढावा बैठकीनंतर के ली जाणार आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात सुकाणू समितीची मंगळवारी बैठक पार पडली. त्यामध्ये याबाबतचे नियोजन करण्यात आले. करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील सीओईपी येथील मोठे करोना उपचार के ंद्र सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच करोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्याबाबत बैठकीत एकमत झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या प्रकारचे र्निबध लावायचे, याबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, आरोग्य विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पिंपरीतील मोठे करोना उपचार के ंद्र तूर्त बंदच

पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सीओईपी येथील मोठे करोना उपचार के ंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मात्र, या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे या ठिकाणचे मोठे करोना उपचार के ंद्र तूर्त सुरू न करण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आले.

सीओईपीमध्ये केवळ प्राणवायूच्या खाटा

सीओईपी येथील करोना उपचार के ंद्रात अतिदक्षता खाटांऐवजी के वळ प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटांची व्यवस्था करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. या के ंद्राचे कं त्राट दिलेल्या संबंधित कं त्राटदाराला पुढील १५ दिवस कोणतेही भाडे न देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:13 am

Web Title: coep corona vaccination center dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लशीच्या १० लाख मात्रा मिळण्यासाठी केंद्राला प्रस्ताव
2 लशीसाठी नावनोंदणी करणे आव्हानात्मक
3 प्रभागाचे गतिपुस्तक : पाण्याची समस्या, वैद्यकीय सेवांसाठी धावपळ (प्रभाग – कळस-धानोरी प्रभाग क्रमांक १)
Just Now!
X