19 September 2018

News Flash

‘स्मार्ट सिटी’त सामूहिक शेती

बाणेरमध्ये समुदाय शेती ही संकल्पना आकारास येणार आहे.

प्लेसमेकिंग अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठीही उपक्रम

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी भागात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झालेली असताना आता बाणेर परिसरातील नागरिकही सामूहिक शेती करताना काही दिवसात दिसणार आहेत. स्मार्ट सिटीच्या प्लेसमेकिंग (स्थळ निर्मिती) या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार परिसरातील मोकळ्या जागेत फळे आणि भाज्यांबरोबरच औषधी वनस्पतींसाठी बागांचे नियोजन स्मार्ट सिटीकडून करण्यात आले असून त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या मोकळ्या आणि वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ ही संकल्पना हाती घेण्यात आली आहे. या जागांचा योग्य पद्धतीने वापर व्हावा आणि नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी ‘प्लेसमेकिंग’ ही संकल्पना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून  आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाणेरमध्ये समुदाय शेती ही संकल्पना आकारास येणार आहे. बाणेर येथील मेडीपॉइंट हॉस्पिटल रस्त्याजवळील सर्वेक्षण क्रमांक २४४ या जागेवर हा उपक्रम होणार आहे.  ‘शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही प्लेसमेकिंगची संकल्पना आहे. बाणेरमधील मोकळ्या जागांत असलेली बहुविध नैसर्गिक संपत्ती लक्षात घेऊन या जागेत फळे आणि भाज्या तसेच औषधी वनस्पतींसाठीच्या बागा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने ही संकल्पना पूर्ण करण्यात येईल,’ अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

HOT DEALS
  • Moto Z2 Play 64 GB Fine Gold
    ₹ 16230 MRP ₹ 29999 -46%
    ₹2300 Cashback
  • Panasonic Eluga A3 Pro 32 GB (Grey)
    ₹ 9799 MRP ₹ 12990 -25%
    ₹490 Cashback

समुदाय शेती, बागकाम कार्यशाळा, हास्यक्लब, लहान कॅफे आणि समुदाय शेतीची उत्पादने विकण्यासाठी दुकानांना जागा असे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि आराम, पावसाच्या पाण्याची साठवण, पालापाचोळा-कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचे पॅनेल्स, एक्युप्रेशर पथ आदीसाठीही जागा ठेवण्यात येणार आहेत. त्याचा एकत्रित आराखडाही तयार असून तो अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीकडून देण्यात आली.

प्लेसमेकिंगमध्ये अनोख्या योजना

बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये (एरिया डेव्हलपमेंट- क्षेत्र विकास) घेण्यात आला आहे. येथील अडीच हजार चौरस मीटर जागेत ई-लर्निग आणि स्कील डेव्हलपमेंट तसेच लिजियर आणि मेडिटेशन ही संकल्पना विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. बिबवेवाडी येथे ई-लर्निग तर वडगावशेरी येथे इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकोलॉजी ही संकल्पना मोकळ्या जागेवर आकार घेणार आहेत. सर्व वयोगटातील नागरिकांना उपयुक्त ठरेल, अशी संकल्पना प्लेसमेकिंगमागे असल्याचे सांगण्यात आले. वडगाव शेरीतील दोन हजार १८९ चौरस मीटर जागेवर अ‍ॅम्फी थिएटर, पर्यावरण अभ्यास आणि प्रदर्शन केंद्र, कार्यशाळेसाठी जागा आणि फुलपाखरू उद्यान करण्यात येणार आहे. बिबवेवाडी आणि वडगावशेरी येथील जागांसाठी एक कोटी साठ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

First Published on December 22, 2017 3:07 am

Web Title: collective farming in smart city project