08 March 2021

News Flash

महाविद्यालयांच्या आवारातील दलालांपासून सावध राहा!

बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. येत्या काही दिवसांत दहावीचे निकाल लागतील.

पोलिसांचे आवाहन

महाविद्यालयांच्या आवारात प्रवेश मिळवून देण्याच्या बतावणीने फसवणूक करणारे दलाल फिरतात. या पाश्र्वभूमीवर दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारची बतावणी करणारे आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. येत्या काही दिवसांत दहावीचे निकाल लागतील. पुण्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी बाहेरील शहरांतून मोठय़ा संख्येने विद्यार्थी येतात. महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने पालकांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून भामटय़ांना अटकही केली होती. प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविणारे दलाल महाविद्यालयाच्या आवारात फिरत असतात. महाविद्यालयात ओळख आहे, अशी बतावणी करून पालकांकडून पैसे उकळले जातात.

विविध शासकीय अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत. त्यांच्या भूलथापांना पालकांनी बळी पडू नये तसेच प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करणारे दलाल आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षात (दूरध्वनी-१००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:24 am

Web Title: college admission brokers broker issue in pune
Next Stories
1 अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा महामेळावा
2 खडसेंचा राजीनामा नको, बडतर्फीच हवी
3 अजित पवार यांचे ‘तारीख पे तारीख’
Just Now!
X