News Flash

वाणिज्य शाखा म्हणजे करिअरचा महामार्ग!

कालानुरूप डेटा अ‍ॅनालिटिक्स, ई कॉमर्स, लॉजिस्टिक्स  असे काही नवे अभ्यासक्रम वाणिज्य शाखेत निर्माण होत आहेत.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांचे मत
पुणे : आज जग ही बाजारपेठ झाली आहे. विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत असल्याने वाणिज्य शाखा करिअरचा महामार्ग आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा, असे मत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी गुरुवारी मांडले. पदवी अभ्यासक्रमाला पूरक अभ्यासक्रमांची जोड दिल्यास के वळ पदवीधारकालाही रोजगारसंधी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘लोकसत्ता’तर्फे  आयोजित ‘मार्ग यशाचा’ या वेब संवादात डॉ. रावळ यांनी वाणिज्य शाखेतील विविध पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांसह करायची तयारी यासह करिअर संधींबाबत विद्यार्थी-पालकांना सखोल मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी स्वाती केतकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी-पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. रावळ यांनी उत्तरेही दिली. ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

डॉ. रावळ म्हणाले, की माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गरजांमुळे वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आज जग ही बाजारपेठ झाली आहे. वस्तू आणि सेवांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. खासगीकरण, उदारीकरणामुळे नफा केंद्रस्थानी आला. ग्राहकांच्या गरजा भागवणे, त्यांना अनुभव देण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बाजारात स्पर्धा वाढली आहे. संगणकीय क्रांतीमुळे ई-बँकिं ग, ई-शिक्षण, ई-विपणन होऊ लागले आहे. वस्तू आणि सेवांचे परिमाण, वस्तूंच्या साठवण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. विक्रीपश्चात सेवांना महत्त्व आले आहे. व्यापार नफ्याच्या पलीकडे गेल्याने नवीन प्रयोग, नव्या सेवा, नियंत्रित किं मत आवश्यक झाले आहे. त्यामुळे कार्यक्षम आणि कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होऊन वाणिज्य शाखेत सर्वांत जास्त संधी उपलब्ध होत आहेत.

वाणिज्य शाखेत ह््युमन रिसोर्स, टॅक्सेशन, इंटरनॅशनल बिझनेस, अकाऊंटिंग, आयटी, इंडस्ट्रियल लॉ असे काही विषय, किमान दोन भाषांचा अभ्यास अपरिहार्य आहे. वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर राज्य-केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे, खासगी विद्यापीठांमध्ये वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी स्तरावर पारंपरिक पदवीसह बीबीए-एमबीएअंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस, मॅनेजमेंट सायन्स, हॉस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याशिवाय सनदी लेखापाल, कं पनी सचिव, कॉस्ट अकाऊंटट, सीएफए, सीएमए असे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कंपन्यांमध्ये नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय करणे शक्य आहे. पण हे अभ्यासक्रम आव्हानात्मक असल्याने ते जाणीवपूर्वक, कष्टपूर्वक करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.

कालानुरूप डेटा अ‍ॅनालिटिक्स, ई कॉमर्स, लॉजिस्टिक्स  असे काही नवे अभ्यासक्रम वाणिज्य शाखेत निर्माण होत आहेत. येत्या काळात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संधी निर्माण होणार आहेत. परदेशातील विद्यापीठांमध्येही अकाउंटिंग, मॅनेजमेंट, अर्थशास्त्र, बिझनेस असे वेगवेगळ्या प्रकारचे पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी टोफे ल, जीआरई अशा परीक्षा द्याव्या लागतात. अनेक विद्यापीठांचे ऑनलाइन अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. एमबीएसाठी आयआयएमसाठी तयारी के ल्यास अन्य संस्थांमधील प्रवेशासाठी त्याचा अधिक फायदा होतो.

शेअर बाजारासंदर्भातील अभ्यासक्रम करूनही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी खासगी अभ्यासक्रमांसह मुंबई शेअर बाजार मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहेत. वाणिज्य शाखेच्या चांगल्या शिक्षकाला परदेशातील संस्थांमध्ये अध्यापनासाठी त्या देशाची भाषा, कायदे, व्यापार धोरणांचा अभ्यास करायला हवा. विमा क्षेत्रात स्वतङ्मचा व्यवसाय आणि नोकरी अशा दोन्ही प्रकारच्या संधी आहेत.

एकूण वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना डेटा एन्ट्री ऑपरेटरपासून डेटा अ‍ॅनालिसिसपर्यंत अनेक संधी वाणिज्य शाखेत आहेत, असे डॉ. रावळ यांनी नमूद के ले.

स्वविकास आवश्यक…

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन प्रकारच्या संधी आहेत. पण त्यासाठी संवाद कौशल्य, विश्लेषण, संशोधन, तर्क , सर्जनशीलता, संगणकीय कौशल्ये, समूहात काम करण्याची क्षमता अशी काही कौशल्ये आवश्यक आहेत. वाणिज्य पदवी अभ्यासक्रम करताना महाविद्यालयातील वर्गांच्या वेळाव्यतिरिक्त उर्वरित वेळात महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन, एक मराठी आणि एक इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन, महाविद्यालयातील कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतल्यास कौशल्यवृद्धी, सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. महाविद्यालयीन सुटीच्या काळात अनुभवासाठी नोकरी के ल्यास आपली आवड कळण्यास आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना टॅलीसारखा अभ्यासक्रम, परकीय भाषा अशा पूरक अभ्यासक्रमांची जोड दिल्यास ते उपयुक्त ठरते, असेही डॉ. रावळ यांनी नमूद के ले.

फॉरेन्सिंग अकाउंटिंगला मोठ्या संधी

गेल्या काही वर्षांत आर्थिक घोटाळ्यांचा शोध घेण्याबाबत फॉरेन्सिक अकाउंटिंग ही नवी शाखा विकसित झाली आहे. या शाखेचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागले आहेत. या क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत, असे डॉ. रावळ म्हणाले.

आज काय?  विज्ञान शाखेतील संधी 

मार्गदर्शक : विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

वेळ : संध्याकाळी ५ वाजता

सहप्रायोजक : आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

सहभागी होण्यासाठी

http://tiny.cc/LS_MargYashacha येथे नोंदणी आवश्यक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:04 am

Web Title: commerce career college of commerce akp 94
Next Stories
1 बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद 
2 डॉ. मोहन आगाशे यांचे आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
3 पुणे : खडकवासला ९६ टक्के भरलं, नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
Just Now!
X