तंत्रज्ञान विकास मंडळाकडून व्यावसायिक उत्पादनास परवानगी

पुणे : त्रिमिती छपाई आणि फार्मास्युटिकलच्या एकत्रित वापरातून नव्या प्रकारच्या विषाणूरोधक मुखपट्टीची निर्मिती करण्यात पुण्यातील नवउद्यमींना यश आले आहे. थिंकर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे या नवउद्योगाचे नाव असून त्यांनी विकसित के लेल्या मुखपट्टीचे व्यावसायिक उत्पादन करण्यास केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने परवानगी दिली आहे.   मागील वर्षी मे महिन्यात करोना प्रतिबंधात्मक उपायांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळाने उपक्रम हाती घेतला. त्या उपक्रमाचा भाग म्हणून ही मुखपट्टी विकसित करण्यात आली असून करोना विषाणूचा प्रसार रोखण्यात तीन पदरी, एन – ९५ किं वा कापडी मुखपट्टीच्या तुलनेत ती अधिक परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

थिंकर टेक्नॉलॉजी इंडियाचे संस्थापक संचालक

डॉ. शीतलकु मार झांबड म्हणाले,की करोना संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टी हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय असल्याचे लक्षात आले. त्यामुळे स्वस्त, मात्र प्रभावी विषाणूरोधक मुखपट्टी तयार करण्याचे प्रयत्न सुरू के ले. एन-९५ मुखपट्टी, तिहेरी मुखपट्टी, साध्या कापडाची किं वा त्रिमिती मुखपट्टीमध्ये वापरण्यायोग्य फिल्टरची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी त्रिमिती तंत्रज्ञान वापरण्यात आले. करोना विषाणू निष्क्रिय करण्यासाठी मुखपट्टीच्या कापडी थराला सोडियम अ‍ॅलोफिन सल्फोनेट मिश्रणाचा वापर के ला. हा घटक साबण निर्मितीत वापरला जातो. विषाणू त्या थराला चिकटल्यास त्याचे बाह््य आवरण विस्कळीत होण्यास मदत होते. त्यामुळे इतर मुखपट्ट्यांच्या तुलनेत वापरकत्र्याला ते अधिक संरक्षण देतात.  त्रिमिती तंत्रामुळे प्लास्टिक साचा किं वा त्रिमिती साच्यावर अनेक थर असलेल्या कापडाची मुखपट्टी बसवून पुन्हा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कमीत कमी

कि मतीत अधिकाधिक संरक्षण मिळेल. सदर मुखपट्ट्यांच्या व्यावसायिक उत्पादनासाठी एका खासगी कं पनीबरोबर सामंजस्य करार के ल्याचेही डॉ. झांबड यांनी स्पष्ट के ले.