News Flash

दहावी-बारावी परीक्षा नियोजनासाठी समिती

आजी-माजी अधिकाऱ्यांचा समावेश

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनासाठी राज्य शासनाने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आजी-माजी अधिकाऱ्यांचा समावेश असून, ही समिती परीक्षांच्या आयोजाबाबत उपाययोजना सुचवणार आहे.

राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने काही जिल्ह्य़ांतील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा घेणार अशी चर्चा आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजनपूर्वक आणि आवश्यक ती काळजी घेऊन ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट के ले आहे. तसेच दहावी आणि बारावीचे मिळून ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याने ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे राज्य मंडळाकडूनही नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीची शुक्रवारी बैठक झाली.

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, मुंबई विभागीय मंडळाचे माजी अध्यक्ष विनय दक्षिणदास, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य विकास गरड, नितीन म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, एल. एम. पवार, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांचा समावेश आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पार पडेपर्यंत वेळोवेळी या समितीकडून राज्य मंडळाला परीक्षेच्या नियोजनाबाबत सल्ला, सूचना दिल्या जातील. या सूचना विचारात घेऊन आवश्यकतेनुसार नियोजन के ले जाईल.

– दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:00 am

Web Title: committee for 10th 12th examination planning abn 97
Next Stories
1 Coronavirus : पुण्यात दिवसभरात ९६३ नवीन करोनाबाधित, चार रुग्णांचा मृत्यू
2 ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन
3 Pooja Chavan Case – भाजपाच्या नगरसेवकाकडून धक्कादायक खुलासा
Just Now!
X