28 January 2020

News Flash

सलमानच्या चित्रपटात काम देतो सांगत महिलेला लाखांचा गंडा

आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट किक-२ मध्ये काम मिळवून देतो असं सांगत महिलेला लाखांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात घडली आहे. वृषाली साठे असं या महिलेचं नाव असून, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने हिरल ठक्कर आणि अमर बुटाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिरल ठक्कर आणि अमल बुटाला यांनी फिर्यादी वृषाली साठे यांच्याशी ओळख केल्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर सलमान खानच्या आगामी किक-२ चित्रपटात तुम्हाला सपोर्टींग रोल मिळवून देतो असं आश्वासनही दिलं. याचसोबत वृषाली यांच्या भावालाही असिस्टंट डिरेक्टरचं काम मिळवून देतो असं आश्वासन दिलं. या कामासाठी हिरल ठक्कर आणि अमर बुटाला यांनी वृषाली साठे यांच्याकडून १ लाख ८२ हजार ६०० रुपये उकळले.

मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वृषाली साठे यांनी वारजे पोलिस स्टेशनमध्ये हिरल ठक्कर आणि अमर बुटाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

First Published on September 11, 2019 4:25 pm

Web Title: complaint registered against 2 persons for allegedly promising to give work in salmans movie psd 91
Next Stories
1 पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
2 पोलीसभरती प्रक्रिया ‘महापरीक्षा’द्वारे नको
3 वनरक्षक परीक्षेत गैरप्रकाराचा आरोप
Just Now!
X