News Flash

मद्यपी मोटारचालकामुळे संगणक अभियंता युवती मृत्युमुखी

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री बाराच्या सुमारास ती कामावरून घरी निघाली होती.

मद्यपी मोटारचालकाच्या बेदरकारणामुळे दुचाकीस्वार संगणक अभियंता युवती मृत्युमुखी पडल्याची घटना खराडी भागात घडली. या प्रकरणी मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली.

श्रद्धा मधुकर बांगड (वय २२, मुळ रा.सीए रस्ता, बालभवन मरोबा मैदान, नागपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार संगणक अभियंता युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालक मनीष बाळाराम चौधरी (वय ३७,रा. पूर्वा हाईटस्, खराडी) याला अटक करण्यात आली. पोलीस नाईक पांडुरंग माने यांनी यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मूळची नागपूरची रहिवासी आहे. सध्या ते खराडी भागात वास्तव्यास असून खराडी परिसरातील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत ती काम करत होती.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री बाराच्या सुमारास ती कामावरून घरी निघाली होती. त्यावेळी खराडी परिसरात  भरधाव मोटारीने दुचाकीस्वार श्रद्धाला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मोटारचालक चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक कि रण वराळ तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे स्टेशन परिसरातील रेल्वे रुग्णालयासमोर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:50 am

Web Title: computer engineer dies alcoholic motorist akp 94
Next Stories
1 लोकांकिकेतील सादरीकरणांना नाटय़प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
2 नदीकाठ संवर्धन प्रकल्प रखडणार?
3 भाजप शहराध्यक्ष पदासाठी दोन्ही आमदार अनुत्सुक
Just Now!
X