18 February 2019

News Flash

संगणक अभियंता महिलेची इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

पिंपरीतील काळेवाडी येथील घटना

पल्लवी मुजुमदार

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे इमारतीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेऊन एका संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी उदयन मुजुमदार (वय ३०, रा. पार्कस्ट्रीट, काळेवाडी, पिंपरी) असे या संगणक अभियंता असलेल्या महिलेचे नाव आहे. आपला एक वर्षाचा मुलगा आजारी असल्याने पल्लवी दुपारी त्याला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या, त्यानंतर त्या घरी परतल्या. त्यानतंर काही वेळानंतर त्या राहत असलेल्या घराच्या बाजूच्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर गेल्या आणि त्यांनी या इमारतीच्या डक्टमधून खाली उडी घेतली. यात पल्लवी गंभीर जखमी झाल्या त्यामुळे त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पल्लवी या हिंजवडी येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करीत होत्या. त्यांचे पती देखील संगणक अभियंता आहेत.

First Published on February 9, 2018 9:48 pm

Web Title: computer engineer woman suicide by jumping from the 12th floor of building