पुणे : मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिके ला निधीची चणचण भासत असताना नगर रस्त्यावरील सुस्थितीत असलेल्या बीआरटी मार्गातील डांबरीकरण उखडून तेथे काँक्रिटीकरण करण्याचा घाट महापालिके ने घातला आहे. बीआरटी मार्गासाठी २० कोटींची उधळपट्टी या निमित्ताने होणार असून संगमवाडी ते सादलबाबा चौक या दरम्यानच्या अडीच किलोमीटर लांबीच्या मार्गात काँक्रिटीकरणाचे काम महापालिके ने सुरू के ले आहे. महापालिके चे उत्पन्न घटले असतानाही प्रशासनाकडून सुरू असलेली उधळपट्टी वादात सापडण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वाहतूक गतिमान व्हावी, यासाठी महापालिके ने शहराच्या काही भागात शेकडो कोटी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग विकसित केले आहेत. नगर रस्त्यावरही महापालिके ने बीआरटी मार्गाची बांधणी के ली असून हा मार्ग सुस्थितीत आहे. नगर रस्ता बीआरटी मार्ग सुरू करताना रस्त्याचे डांबरीकरण महापालिके च्या पथ विभागाकडून करण्यात आले होते. सध्या या मार्गाचा वापरही सुरू आहे. मात्र त्यानंतरही महापालिके च्या पथ विभागाने डांबरीकरण उखडून तेथे काँक्रिटीकरणाचा घाट घातला आहे. शिवणे ते खराडी या नदीकाठच्या रस्त्यामध्ये संगमवाडी हा रस्ता येतो. त्यानुसार रस्त्याचे काम करण्यात येत असून या संपूर्ण रस्त्याच्या कामाचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार हे काँक्रिटीकरण सुरू असल्याचा दावा महापालिके च्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवणे ते खराडी या मार्गाचे काम सुरू असले तरी ते भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या जवळच्या ठेके दाराला दिल्याची महापालिके तील चर्चा आहे. या ठेके दाराचा आर्थिक फायदा व्हावा, यासाठीच काँक्रिटीकरणाचा घाट घातल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. करोना संसर्गामुळे महापालिके चे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे अनावश्यक उधळपट्टी टाळण्यासाठी आणि कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महापालिके च्या स्तरावर वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टीचा प्रकार सुरूच राहिला आहे. नगरसेवकांना प्रभागात विविध प्रकारची कामे करण्यासाठी आवश्यक असलेली मान्यता वित्तीय समितीकडून दिली जात नसल्याने त्याबाबत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्त के ली आहे. त्यावरून आयुक्त विरोधात नगरसेवक असा संघर्षही पुढे आला होता. मात्र प्रशासनाच्या या उधळपट्टीकडे सत्ताधाऱ्यांचेही झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.

बीआरटी मार्गावर उधळपट्टी

शहरातील सर्वच बीआरटी मार्गावर प्रशासनाकडून सातत्याने उधळपट्टी आणि नवनवीन प्रयोग केले जात आहेत. सातारा रस्त्यावर अनेक कामे कित्येक महिने रखडली होती. सेवा रस्ता स्थलांतर करणे, स्थानकांची कामे करणे, सिग्नल बसविणे अशा कामांवर सातत्याने कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्वारगेट ते हडपसर बीआरटी मार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्यानंतर त्यासाठी शंभर कोटींचा निधी लागला होता. मात्र याच रस्त्याच्या पुनर्निर्माणासाठी महापालिके ने ८५ कोटींचा

खर्च के ल्याची वस्थुस्थिती आहे. नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्गाचीही सातत्याने दुरुस्ती के ली जात आहे. त्यामुळे बीआरटी मार्गाच्या नावाखाली सातत्याने उधळपट्टी होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.