केंद्र सरकारच्या बहुचíचत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे शहरातील कोणता भाग परिसर विकासासाठी (एरिया डेव्हलपमेंट) निवडायचा, या विषयावरून महापालिका आयुक्तांनी शनिवारी बोलावलेल्या बैठकीत खासदार, आमदार व पक्षनेत्यांमध्ये चांगलेच मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेर यासंदर्भात बैठकीत कोणताही निर्णय न घेता सोमवारी निर्णय घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चच्रेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा, यावर सोमवारी दुपापर्यंत एकमताने निर्णय देऊ असे प्रशासनाला दिले. पालकमंत्री बापट यांच्यासह महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, प्रा. मेधा कुलकर्णी, अनिल भोसले, जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, डॉ. नीलम गोऱ्हे, उपमहापौर आबा बागूल, सभागृह नेता शंकर केमसे, महापालिकेतील विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरिवद िशदे, भाजपचे गटनेता गणेश बीडकर, मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांची बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी अभियानात पालिका प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती बैठकीत दिली. स्मार्ट सिटी अभियानाचा सध्या तिसरा टप्पा सुरू असून, त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे, असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग त्यासाठी निश्चित केला आहे. शहरातील हा भाग एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी स्मार्ट सिटी अभियानात स्वतंत्र निधी मिळेल अशी माहिती आयुक्तांनी या वेळी दिली. त्यासाठीचा अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी अशीही अपेक्षा आयुक्तांनी बैठकीत व्यक्त केली.
आमदार अनिल भोसले, दीप्ती चवधरी, जयदेव गायकवाड तसेच उपमहापौर बागूल आदींनी निवडलेल्या भागातील कामांसाठी निधी कसा मिळणार, किती मिळणार, त्यात महापालिकेचा हिस्सा किती असणार असे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित केले. महापालिका या भागात नेमकी कोणती कामे करणार व त्या कामांचा खर्च किती असे काहीच या प्रस्तावातून दिसत नसल्याचे अरविंद शिंदे यांनी या वेळी सांगितले. आमदार तापकीर यांनी तेवीस गावांचा या अभियानासाठी काहीच विचार झाला नसल्याची टीका केली. ही स्मार्ट सिटी नाहीतर हा स्मार्ट पार्ट आहे आणि त्याचेही काम दहा वर्षे चालणार आहे, असे बागूल म्हणाले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यातील कामांसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागासाठी पुढे येत असतील तर स्थानिक कंपन्यांनाही समाविष्ट करायला हवे असे सांगितले. एकुणातच बैठकीत अनेक मते व्यक्त करण्यात आल्यामुळे तसेच परस्परांवर टीकाही झाल्यामुळे परिसर निवडण्याबाबत कोणताच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे परिसर निश्चित करण्याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.