News Flash

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने शहराच्या विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने शहराच्या विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघातील एकू ण ३५ पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने के ली.

बीटी कवढे रस्ता येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तत्कालीन केंद्र सरकारने इंधनदरवाढ के ली नाही, असे त्यांनी सांगितले. करोना संसर्गामुळे नागरिक अडचणीत असताना पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून मोदी सरकारने सामान्य लोकांचे जगणे हैराण के ले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी के ली. जोशी यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारविरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष विरेंद्र किराड, नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे, प्रवीण करपे या वेळी उपस्थित होते.

सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ महापालिके तील गटनेता आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुलाब पुष्प देण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल, कामगार नेते सुनील शिंदे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार, रमेश सोनकांबळे यांच्यास अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. इंधन दरात होत असलेली वाढ हा एकप्रकारे अत्याचार आहे. संकट काळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी दरवाढ करण्यात येत आहे, असे आबा बागुल यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:47 am

Web Title: congress agitation against petrol diesel price hike ssh 93
Next Stories
1 Pune MIDC Fire : आगीचं क्रौर्य! ‘त्या ’ १८ जणांची ओळखही पटेना
2 Pune MIDC Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर!
3 पुणे : केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू
Just Now!
X