पुण्यातील कासेवाडीमध्ये मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर चालक, साऊंड मालक यांना मारहाण केल्याप्रकरणी आणि गणपतीच्या मूर्तीचे विटंबन केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवेला पोलिसांनी अटक केली. युवराज सुलतान अडसूळ या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडी येथे रविवारी संध्याकाळी राजीव गांधी पतसंस्थेच्या येथे अशोक तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात होती. मिरवणुकीतील ट्रॅक्टरचा चालक आणि साऊंड सिस्टिमचा मालक यांना ओढा रे, मारा, सोडू नका अशी मारहाण करण्याची चिथावणी अविनाश बागवे यांनी दिली.

त्यानंतर बागवे यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचालक सोमनाथ म्हस्के आणि ओंकार कोळी यांना बेदम मारहाण केली.या सर्व प्रकारात साऊंड सिस्टिमची यात मोडतोड झाली असून चप्पल, शूज, दगड हे मिरवणुकीच्या दिशेने या कार्यकर्त्यांनी फेकले. या सगळ्या प्रकारात गणेशमूर्तीची विटंबना झाल्याचे फिर्यादी ने सांगितले आहे.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अविनाश बागवे यांच्यासह पंधरा जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress corporator avinash bagwe arrested for vandalizing ganesh ido
First published on: 24-09-2018 at 18:21 IST