News Flash

सरकार प्रकाश शेडेकर यांच्या पाठिशी, चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्रज येथील घरी जाऊन भेट घेतली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्रज येथील घरी जाऊन शुक्रवारी भेट घेतली. सरकार प्रकाश शेडेकर यांच्या पाठिशी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्देशेवरून उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखल ओतून त्यांना धक्काबुक्की केली होती.

नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

नितेश राणे यांनी केलेल्या कृतीचा त्यांचे वडील नारायण राणे यांनीही निषेध करत तातडीने अधिकाऱ्याची जाहीर माफी मागितली होती. कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या चौपदरीकरणाने महामार्गालगतच्या उपरस्त्यांवर चिखल साचला आहे. रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत. तेव्हा प्रथम उपरस्त्यांची कामे न करता महामार्ग चौपदरीकरण सुरू असल्याबद्दल जाब विचारायला नितेश राणे आले होते.

सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असून प्रकाश शेडेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 7:48 pm

Web Title: congress mla nitesh rane assaulting government official prakash shedekar dmp 82
Next Stories
1 पुणे: जवानाने रायफल मधून स्वत:वर गोळया झाडून केली आत्महत्या
2 दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर
3 धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याचे प्रकार सुरूच
Just Now!
X