कांदा, डाळी, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरुद्ध शहर काँग्रेसतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात आली. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, पक्षाचे गटनेता अरविंद शिंदे, रोहित टिळक, नगरसेवक संजय बालगुडे, मिलिंद काची, मुकारी अलगुडे, लक्ष्मी घोडके यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने चुकीचे धोरण आखल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याचे यावेळी झालेल्या सभेत अभय छाजेड म्हणाले.