पुणे : रक्तद्रव (प्लाझ्मा) दान वाढवण्यासाठी करोना रुग्णांना सरकारी किं वा खासगी रुग्णालयात, करोना काळजी केंद्रात दाखल करून घेतल्यानंतर संबंधितांकडून रक्तद्रव दान करण्याबाबतचा अर्ज भरून घेण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात रक्तद्रव उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘शहरात २० रक्तपेढय़ा आहेत. या पेढय़ांकडून आतापर्यंत १६०० पिशव्या रक्तद्रव गोळा करण्यात आले असून त्यापैकी १३५० पिशव्या रक्तद्रव देण्यात आले आहे. २५० पिशव्या रक्तद्रव सध्या शिल्लक आहे. मात्र, हा साठा कमी असून रक्तद्रव दान वाढण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याकरिता करोनाचे रुग्ण सरकारी किं वा खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच त्यांची संमती घेऊन रक्तद्रव दानाचा अर्ज भरून घेण्यात येत आहे. याकरिता राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे हे रुग्ण उपचाराअंती बरे होऊन विहित कालावधीनंतर रक्तद्रव दान करतील. अशाप्रकारे आगामी काळात रक्तद्रवाचा तुटवडा शहरात जाणवणार नाही.’

दरम्यान, विभागीय आयुक्तालयाकडून ‘पुणे प्लाझ्मा डॉट इन’ हे संके तस्थळ सुरू करण्यात आले आहे. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने तयार के लेल्या https://puneplasma.in  या संके तस्थळावर रक्तद्रव दान

करण्यासाठी नोंद करावी. ज्यांना करोना होऊन ते बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरात प्रतिपिंड तयार झालेले असतात. त्यामुळे या संबंधित व्यक्तींचे रक्तद्रव घेऊन त्याच रक्तगटाच्या रुग्णाला आवश्यकतेनुसार देण्यात येते, असेही राव यांनी सांगितले.