News Flash

प्रेम प्रकरणातून महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देत, कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून मारली उडी; संबंधित कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्यात, प्रेम प्रकरणातून पोलीस कॉन्स्टेबलने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत घडली आहे. त्यानुसार संबंधित कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल निरावणे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक आणि आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेम संबंध होते. मात्र, महिला अधिकारी इतरांना बोलत असल्याचा राग कॉन्स्टेबल अनिलला अनावर होत होता. याच वादातून महिला अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत, कॉन्स्टेबल अनिलने दिघी पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. कॉन्स्टेबल अनिलला महिला अधिकारीचे इतरांना बोलणं आवडत नव्हतं. यावरून त्यांच्यात शाब्दिक आणि किरकोळ भांडणही होत असे.

दरम्यान, एक जानेवारी रोजी अनिल निरावणे हे रात्रपाळी ड्युटीवर होते. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास कॉन्स्टेबल अनिल याने महिला अधिकारी यांना समोरासमोर अपशब्द वापरून धमकी देत, पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटने प्रकरणी कॉन्स्टेबल अनिलवर आत्महत्येचा प्रयत्न आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 9:39 pm

Web Title: constable attempts suicide by jumping from police station building msr 87 kjp 91
Next Stories
1 पुण्यात ऑफिसमध्ये घुसून तरुणीचं अपहरण; मित्र आणि कर्मचारी फक्त पाहत राहिले
2 कारभारी लय’भारी’! पुण्यात विजयी पतीला खांद्यावर उचलून पत्नीने काढली मिरवणूक
3 मुंबईची अपर्णा अगरवाल सीएस फाउंडेशनमध्ये द्वितीय
Just Now!
X