पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात एका कंटेनरचा अपघात झाला. खेड घाटातील पहिल्या वळणावर पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये कंटेनर सुमारे अडीचशे फुट खोल दरीत कोसळला. या अपघातानंतर कंटेनरमधील वाहक आणि चालक यांना गॅस कटरचा उपयोग करत बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थिती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास खेड घाटातील पहिल्याच वळणावर हा अपघात झाला. अंधार व खोल दरीमुळे कंटेनर बाहेर काढण्यास पोलिसांना तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. कंटेनरचा चक्काचूर झाला असून चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.