News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, जखमी चालकाची अर्ध्या तासाने सुटका

कंटनेरचा चालक साधारण अर्धा तास गाडीत अडकला होता, ज्याची नंतर सुटका करण्यात आली

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अमृतांजन पुलाजवळ असलेल्या उतारावर एका भरधाव कंटनेरने तीन वाहनांना धडक दिली. या धडकेत एक चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ९.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. कंटनेरचा चालक साधारण अर्धा तास गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलीस आणि आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. या अपघातामुळे काही वेळासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. जी नंतर सुरळीत झाली असेही समजले आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर चालला होता. त्याचवेळी कंटेनर चालकाचा ताबा सुटला ज्यामुळे त्याने समोर असलेल्या इनोव्हाला धडक दिली. इनोव्हा तिच्या समोर असलेल्या बीएमडब्ल्युला धडकली. त्यानंतर हा कंटनेर आणखी एका कंटेनरला धडकला. ज्यामुळे हा विचित्र अपघात झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 12:19 pm

Web Title: container driver injured in road accident on mumbai pune express way
Next Stories
1 पुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित
2 बेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड
3 एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
Just Now!
X