News Flash

कंत्राटी महिला कामगाराच्या कष्टातून मुलगा डॉक्टर

लोकसत्ता प्रतिनिधी िपपरी: झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेतील वास्तव्य, कोणाचाही आधार नसलेल्या आणि जेमतेम पगार असलेल्या महिलेने आपल्या मुलाला अत्यंत हालअपेष्टा सहन करत डॉक्टर केले. पुढील शिक्षणासाठी

अमित आढाव आणि कल्पना आढाव.

लोकसत्ता प्रतिनिधी

िपपरी: झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेतील वास्तव्य, कोणाचाही आधार नसलेल्या आणि जेमतेम पगार असलेल्या महिलेने आपल्या मुलाला अत्यंत हालअपेष्टा सहन करत डॉक्टर केले. पुढील शिक्षणासाठी त्याला इंग्लंडला जाण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या कुटुंबाने मदतीचे आवाहन केले आहे.

कल्पना आढाव असे या महिलेचे तर अमित हे मुलाचे नाव आहे. िपपरीत झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेत ते राहतात. गेल्या १४ वर्षांपासून कल्पना पालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सुरुवातीला त्यांना अवघे तीन हजार रूपये पगार मिळत होता. आता १४ हजारापर्यंत मिळतो. मुलगा अमित याला शिकून मोठय़ा हुद्दय़ावर बसलेले पाहायचे, त्यांचे स्वप्न होते. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होण्यासारखे नव्हते. मात्र, त्यांनी शर्थीने प्रयत्न केले. रुग्णालयातील कामाबरोबरच अनेकांकडे त्यांनी धुणी-भांडीचे कामही केले. बऱ्याच  वर्षांचा खडतर प्रवास पार करत त्यांनी मुलाला जिद्दीने डॉक्टर केले. आता पुढील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी त्याला मिळाली आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तो तिकडे जाण्याचा विचारही करू शकत नाही. आतापर्यंत कसेबसे त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढे माझ्याकडून होणार नाही. त्यामुळे अमितच्या उच्चशिक्षणासाठी दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी मदत करावी, असे आवाहन कल्पना आढाव यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:29 am

Web Title: contract employee womans son became doctor dd 70
Next Stories
1 चव्हाण रुग्णालयात २४ तास करोना चाचण्यांची सुविधा
2 जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून नोंद
3 प्रभागाचे प्रगतिपुस्तक : मुंढव्यातील उड्डाण पूल निरूपयोगी
Just Now!
X