स्वच्छ संस्थेला पुन्हा तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव

पुणे : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत स्वच्छ संस्थेला पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या परिस्थितीत स्वच्छला मुदतवाढ मिळण्याची केवळ औपचारिकताच बाकी

असल्यामुळे शहर स्वच्छतेचे काम ऑगस्टपर्यंत स्वच्छ संस्थेकडेच राहणार आहे.

स्वच्छ संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला जानेवारी महिन्यात दिला होता. मात्र त्या वेळी के वळ पंधरा दिवसांसाठी स्वच्छ संस्थेने कचरा संकलनाचे काम करावे, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यामुळे आणि विरोध होत असल्यामुळे फे ब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्वच्छ संस्थेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. मार्च महिन्यात मुदतवाढीनुसार स्वच्छ संस्थेला १२ मे पर्यंत काम करता येणार आहे. मात्र करोना संसर्गाच्या संकटामुळे आणि या कालावधीत पर्यायी व्यवस्था होऊ न शकल्यामुळे अखेर पुन्हा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समितीला दिला आहे.

शहरातील घरोघरी निर्माण होणाऱ्या वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेबरोबर महापालिके ने करार के ला आहे. पाच वर्षांसाठीचा झालेला हा करार ३१ डिसेंबर २०२० मध्ये संपुष्टात आला. रहिवासी, व्यापारी मिळकतींमधून आणि झोपडपट्टी विभागातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो कचरा संकलित करण्याचे काम स्वच्छ संस्थेकडून के ले जात आहे. त्यापोटी निवासी आणि व्यापारी मिळकती आणि वस्तीमधील मिळकतींमधील नागरिकांकडून ठरावीक शुल्क वसूल करण्याचे अधिकार स्वच्छ संस्थेला देण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या विरोधामुळे स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

६ लाख मिळकतधारकांचा पाठिंबा

स्वच्छ संस्थेचे काम काढून घेतल्यानंतर कचरा संकलनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एका खासगी संस्थेला हे काम देण्यासाठी स्वच्छ संस्थेचे काम काढण्याचा घाट महापालिके ने घातल्याची चर्चा आहे. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सातत्याने प्रसिद्ध के ले होते. स्वच्छ संस्थेचे कचरा व्यवस्थापनाचे प्रारूप मोडीत काढण्याचा प्रकारही काही नगरसेवकांकडून सुरू आहे. स्वच्छ संस्थेच्या कामाला शहरातील ६ लाख मिळकतधारकांनी पाठिंबा दर्शविला असून अनेक नगरसेवकांनी काम काढून न घेण्याबाबत महापौरांना पत्र दिले आहे.

आक्षेप काय, वस्तुस्थिती काय..

स्वच्छ संस्थेचे काम समाधानकारक नाही. स्वच्छ संस्थेला महापालिका वार्षिक रक्कम देत असतानाही घरोघरी के लेल्या कचरा संकलनापोटी सदनिकाधारकांकडून स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी रक्कम वसूल करतात, असे आक्षेप नगरसेवकांनी घेतले आहेत. स्वच्छ संस्थेचे काम काढून घेऊन हितसंबंधातील संस्थेला काम देण्यासाठीच नगरसेवकांचा खटाटोप होता हेही दिसून आले आहे. स्वच्छ संस्थेचे काम समाधानकारक असून सत्तर टक्के  क्षेत्रातील कचरा संकलनाचे काम के ले जात आहे. स्वच्छ संस्थेचे काम पाहून सेवकांना प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.