राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मत

पुणे : करोना महासाथीच्या काळात समर्पण भावनेतून काम केल्यास आपण करोनाला नक्कीच हरवू शकतो. महासाथीच्या या आव्हानाकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल आणि कु लपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी मांडले.

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवी प्रदान समारंभ ऑनलाइन झाला. त्यावेळी कोश्यारी बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे आदी या वेळी उपस्थित होते. पीएच.डी. पूर्ण के लेल्या  संदीप नेवसे, रमेश कवडे, श्रुती गणपुले, मनोज मेघराजानी पूर्णिमा कुलकर्णी, सुनीता बच्छाव, अर्चना गोसावी यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

ऑनलाइन पदवी प्रदान कार्यक्रम, करोना काळातील विद्यापीठाच्या कामाचे कोश्यारी यांनी कौतुक के ले. ‘नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाची संकल्पना आहे. या संकल्पनेला प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांना सर्व विद्याशाखांतील ज्ञान मिळू शकते,’ असे ते म्हणाले.

डॉ. नौशाद फोर्ब्स यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन के ले. ‘प्रत्येकाने आपले काम आनंदाने करायला हवे. तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसल्यास ते काम तातडीने थांबवा. इतरांचे ऐकू न आपल्या अभ्यासक्रमाची, करिअरची निवड करणे योग्य नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमाइतके च मानव्यविज्ञान अभ्यासक्रमांनाही महत्व दिले पाहिजे. औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास कं पनीच्या प्रसिद्धीपेक्षा गुणवत्तेवर भर द्यायला हवा,’ असे फोर्ब्स यांनी सांगितले.

सन २०१८-१९ मध्ये आणि त्यापूर्वी विविध विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७ हजार ३५ विद्यार्थ्यांंना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे प्रमाणपत्रे पाठवली जातील.