29 October 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड : स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, १२ जखमी

स्फोटामुळं भिंती पडल्या, खिडक्या ग्रीलसह निखळल्या

पिंपरी : दिघी परिसरात घरगुती गॅसचा भीषण स्फोट झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात रात्रभर घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात १२ जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्फोट अत्यंत भीषण असल्याने शेजारील फ्लॅटचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भिंती आणि दरवाजे तुटून पडले असून खिडक्या या ग्रीलसह निखळल्या आहेत. तर घरातील साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत ज्ञानेश्वर टेमकर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. तर, फ्लॅट क्रमांक १०२ मध्ये राहात असलेले टेमकर कुटुंबातील मंगला टेमकर, अनुष्का टेमकर (वय ७), यशश्री टेमकर (वय २.५) हे जखमी झाले असून त्यांच्या घरी सातपुते नावाचे दोन नातेवाईक आणि त्यांची दोन मुले होती ते देखील या घटनेत जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. तर शेजारील फ्लॅट क्रमांक १०३ मधील महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय ३५), आकांशा सुरवाडे (वय १५), दीक्षा सुरवाडे (वय १३), अमित सुरवाडे (वय ८) हे जखमी झाले असून या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे, दिघीमधील महादेव नगर येथे असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये पहाटेच्या सुमारास गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला यात एकूण १२ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. फ्लॅट क्रमांक १०२मध्ये टेमकर कुटुंब राहात असून त्यांच्या घरातील घरगुती सिंलेंडरमधून रात्रभर गॅस गळती झाली आणि यातूनच पहाटेच्या सुमारास वीज किंवा इतर उपकरणे सुरू करण्यास गेल्यानंतर हा भीषण स्फोट झाला असावा अशी शक्यता अग्निशमन दलाच्या विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:26 pm

Web Title: cooking gas leak and severe explosion at pimpri chinchwad one killed 12 injured aau 85 kjp 91
Next Stories
1 मराठा आरक्षण समन्वय समितीचं पुण्यात आंदोलन; अशोक चव्हाणांना उपसमितीतून हटवण्याची मागणी
2 पुणे : परीक्षेसाठी द्यावा लागणार करोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट; डी. वाय. पाटील कॉलेजचा आदेश
3 ‘एकमेव लोकमान्य’ला वाचकांचा उदंड प्रतिसाद
Just Now!
X