News Flash

संसर्ग रोखण्यासाठी समन्वय ठेवा

मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

पुण्यातील करोनाची सद्य:स्थिती आणि आगामी नियोजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तालयात गुरुवारी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

पुणे : पुण्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. विलगीकरण सुविधाचे नेकटे व्यवस्थापन, चाचण्यांसोबत करोना रुग्णांचा शोध मोठय़ा प्रमाणात करा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

विभागीय आयुक्तालयात करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मुंबईप्रमाणे पुण्यातही मोठी करोना काळजी के ंद्रे उभारावीत, शासकीय यंत्रणांमधील योग्य समन्वयाने मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठय़ा करोना के ंद्रांच्या उभारणीनंतर खाटांसाठी होणारी गैरसोय थांबेल. करोना रुग्णाला शेवटच्या क्षणी उपचार मिळण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

करोना चाचण्यांचे अहवाल येण्यास होणारा विलंब गंभीर असून अहवाल २४ तासांत मिळण्याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात कडक बंधने पाळली जातील, नियमांची काटेकोर अंमलबजावणी के ली जाईल, याबाबत लक्ष द्यावे. करोनाचे जास्तीत जास्त रुग्ण शोधणे आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याच्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही. प्रत्येक जिल्ह्य़ात तेथील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्याबाबत यापूर्वीच निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, त्याकरिता

स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांना सोबत घ्यावे, अशा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी या वेळी सूचना केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

* महापालिकांच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

* पुणेकरांच्या मनातील करोनाची भीती घालवण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करा

* रुग्ण शोधून त्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधण्यावर भर द्यावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 1:14 am

Web Title: coordinate to prevent coronavirus infection says chief minister uddhav thackeray zws 70
Next Stories
1 सीबीआयकडून हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यावर गुन्हा
2 दहावीत मराठी माध्यमाला पसंती   
3 साहित्य व्यवहाराला करोनाची बाधा
Just Now!
X