भाजपची मागणी

पुणे : ‘म्युकोरमायकोसिस’ आजाराबाबतची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांच्याकडे के ली आहे. मुळीक यांनी त्याबाबतचे पत्र विक्रम कु मार यांना दिले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नेमकी रुग्णसंख्या किती आहे, आजारातून किती रुग्ण बरे झाले आहेत, याबाबतची माहिती प्रसिद्ध के ली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या आजाराची माहिती देण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे जगदीश मुळीक यांनी या पत्रात नमूद के ले आहे. म्युकोरमायकोसिस आजाराबाबतची सामान्य नागरिकांना माहिती नाही. अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास आजारावरील उपाययोजनांची माहिती मिळण्यास मदत होईल, असे मुळीक यांनी सांगितले.