विविध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकू ण ५५ ठिकाणे निश्चित

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महापालिका प्रशासनाकडून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. कोथरूड-बावधन, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, वारजे-कर्वेनगर,रामटेकडी-वानवडी, बिबवेवाडी, कसबा-विश्रामबाग, हडपसर-मुंढवा, सिंहगड रस्ता, नगर रस्ता-वडगांवशेरी, धनकवडी-सहकारनगर या अकरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण ५५ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सोसायटय़ांच्या परिसरांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. दैनंदिन सरासरी सातशे नवे रुग्ण आढळून येत आहेत. करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रसंचारबंदी बरोबर उपाहारगृहे, मद्यालयांना वेळेच्या मर्यादा घालून देण्यात आल्य आहेत. त्याचबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेकडून ही क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये सोसायटय़ांचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागानुसार ही क्षेत्रे निश्चित झाली आहेत.

कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत बावधन-कोथरूड डेपो या प्रभागातील वंडर फ्युचरा फेज-२, सेफ्रोन अव्हेन्यू, वेलवर्थ टेनसेल टाऊन, सेटीन हिल्स या सोसायटय़ांचा समावेश आहे. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एरंडवणा-हॅपी कॉलनी, कर्वेनगर, वारजे-माळवाडी या प्रभागातील स्वप्नशिल्प सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर सोसायटी, ए. जे. क्लासिक, आदित्य गार्डन सिटी सोसायटींचा समावेश आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी-हिंगणे खुर्द, वडगांव धायरी-वडगांव बुद्रुक या प्रभागातील सन प्लॅनेट, प्रसाद पार्क, शिवसागर सिटी, चक्रधर सोसायटी यांचा समावेश आहे. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शनिवार पेठ-सदाशिव पेठ आणि कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागातील वंृदावन सोसायटी, प्रतिभा कॉर्नर, गुलाब कुंज, ४९ बी, कमला नेहरू, २२३ ए मंगळवार पेठ यांचा समावेश आहे.

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील महंमदवाडी-कौसरबाग, हडपसर गावठाण- सातववाडी आणि फुरसुंगी-धायरी या प्रभागातील उरूळी देवाची, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स, राहुल कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, रूणवाल सोसायटी, रॉयल सोसायटी, अर्बन फेज या भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर आणि मार्केटयार्ड-लोअर इंदिरानगर या प्रभागातील संगम पार्क, डीएसके चंद्रदीप, मुद्रा सोसायटी, गंगाधाम फेज-२, गगन विहार या सोसायटया निश्चित करण्यात आल्या आहेत.

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रामटेकडी-सय्यदनगर, वानवडी या प्रभागातील एसआरपीएफ ग्रुप-१, नानावटी नगर, एसआरपीएफ ग्रुप-२, वानवडी, सूर्यलोक नगरी यांचा समावेश आहे. नगर रस्ता-वडगांवशेरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत खराडी-चंदननगर, वडगांवशेरी-कल्याणीनगर आणि समाविष्ट गावातील गणराज हाईट्स, माउंट अ‍ॅण्ड ग्लोरी सोसायटी, तारांगण सोसायटींचा समावेश आहे.

धनकवडी-सहकारनगर अंतर्गत सहकारनगर-पद्मावती, धनकवडी-आंबेगाव पठार आणि आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागातील हिल टॉप सोसायटी, नटराज रेसिडन्सी सी-विंग, प्लॉट नंबर ५८, विणकर सोसायटी, शिव कॉलनी, सागर बेकरी लेन, सूर्या चौक, आंबेगाव पठार, श्यामाप्रसाद मुखर्जी सोसायटी सी विंग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ आणि रास्ता पेठ-रविवार पेठ तसेच लोहियानगर-कासेवाडी प्रभागातील राऊत वाडा, काची आळी, ४२३ गुरुवार पेठ, अलका हेरिटेज, योगेश्वर सोसायटी यांचा समावेश आहे. शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी आणि डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागातील हरितेज, वृंदावन अपार्टमेंट, जोग सेंटर, पाटील हेरिजेट सोसायटी, आयसीएस कॉलनीमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.