खबरदारीचा उपाय म्हणून महापालिके ची सज्जता

पुणे : करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनांची महापालिके कडून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वीस हजार सक्रिय रुग्णांवर उपचार होतील, एवढ्या क्षमतेच्या पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी महापालिके ने सुरू के ली आहे. प्राणवायूचा पुरेसा साठा, अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन महापालिके च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दिवाळीनंतर शहरात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिके ने उपाययोजनांची सज्जता ठेवली आहे. त्याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

करोनाबाधित रुग्णसंख्येने गाठलेला उच्चांक लक्षात घेऊन दहा टक्के  अधिक क्षमतेच्या रुग्णसंख्येसाठी तयारी करण्याची सूचना के ंद्र सरकारने राज्य शासनाला के ली आहे. शहरात करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या २० सप्टेंबर रोजी नोंदविण्यात आली होती. या दिवशी १७ हजार ७८१ रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या लाटेची तयारी करताना सर्वाधिक रुग्णसंख्येच्या तुलनेत १० टक्के  अधिक रुग्णसंख्या आरोग्य विभागाने गृहीत धरली आहे. त्यानुसार ही संख्या १९ हजार ५६० एवढी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधांच्या उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.

सक्रिय रुग्णसंख्येपैकी १५ ते २० टक्के  रुग्णांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता भासते, ही बाब लक्षात घेऊन महापालिके ला संभाव्य २० हजार रुग्णांपैकी चार हजार रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. त्यासाठी २ हजार ७०० खाटांची उभारणी महापालिके कडून सुरू झाली आहे. खासगी रुग्णालयांमधील ३ हजार ५०० खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. दुसऱ्या लाटेत गृह विलगीकरणात चाळीस टक्के  म्हणजे ७ हजार ८२४ संभाव्य रुग्ण असतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. तर करोना काळजी के ंद्रातील संभाव्य रुग्णसंख्या ८ हजार ८०२ एवढी असू शकते. प्राणवायूची आवश्यकता असलेले रुग्ण २ हजार ९३४, तर अतिदक्षता विभागातील संभाव्य रुग्णसंख्या ५८७ असेल, या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर्स) सुसज्ज ठेवण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिके ने शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या क्षमतेचे करोना उपचार केंद्र उभारले आहे. त्याची क्षमता ८०० खाटांची आहे. तसेच बाणेर येथेही ३१० खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, प्राणवायूचा पुरेसा साठा ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. करोना संसर्गावर नियंत्रण आल्यानंतर बंद करण्यात आलेली करोना काळजी के ंद्रेही चोवीस तासात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.