News Flash

धक्कादायक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीत वावरत होता करोना पॉझिटिव्ह ठेकेदार

आयुक्तांच्या नियमावलीला महापालिकेतच तिलांजली

संग्रहित

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून एक ठेकेदार थेट आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलेल्या नियमावलीला केराची टोपली दाखवून महानगर पालिकेच्या इमारतीत फिरत असल्याचं आढळून आलं आहे. यावर पालिका अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. दरम्यान, संबंधित ठेकेदार हा जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात फिरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, गायकवाड यांनी असं कोणीही आलं नसल्याचं सांगत हात वर केले आहेत.

सर्व पत्रकारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर आहे. करोना पॉझिटिव्ह ठेकेदार बिल मंजूर करून घेण्यासाठी आला असल्याचं खातरेशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. किरण गायकवाड यांना यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी असा कोणीही व्यक्ती माझ्याकडे आला नसल्याचं म्हटं आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीने नियमांचं पालन केले पाहिजे. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे असंही म्हणाले आहेत.

लोकसत्ता ऑनलाइने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना यासंदर्भात विचारलं असता, “संबंधित प्रकरण माझ्यापर्यंत आलं आहे. त्याची चौकशी करून जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार,” असल्याची माहिती दिली.

दरम्यान, आयुक्त राजेश पाटील संबंधित व्यक्तींवर काय कारवाई करतात का हे पाहणे महत्वाचे आहे. नियम हे केवळ सर्वसामान्य व्यक्तींनाच लागू पडतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आणखी वाचा- पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची महत्वाची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी ८१२ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून यावर प्रतिबंध म्हणून शहरातील उद्याने आजपासून ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, होम आयसोलेट चे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:18 pm

Web Title: corona positive contractor in pimpri chinchwas municipal corporation kjp 91 sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एमपीएससी परीक्षा गोंधळावर अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले…
2 पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची महत्वाची माहिती
3 स्पर्धा परीक्षार्थींचा उद्रेक
Just Now!
X