भारतात लसींच्या उत्पादनात तुटवडा निर्माण झाल्याने परदेशातील लस आयात कराव्या लागणार आहेत. परंतु परदेशी लसींबाबत सुरुवातीला सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लसींच्या पुरवठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुण्यातील एका व्यक्तीने चक्क फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच लसीची मागणी केली आहे.

पुण्याच्या प्रकाश मीरपुरी यांनी फायझरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांना एक ईमेलद्वारे पत्र लिहून भारतात लस उपलब्ध होईल का असा विचारणा केली. त्याच्या या प्रश्नावर अल्बर्ट बोर्ला यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

फायझरच्या सीईओनं दिलं उत्तर

बोर्ला यांनी २६ मे रोजी मीरापुरी यांना ईमेलद्वारे उत्तर दिलं आहे. बोर्ला यांनी मीरपुरी यांच्याआरोग्याबद्दल विचारपूस केली. मीरापुरी यांनी कुटूंबाला फायझर-बायोटेकची लस देण्याच्या विचार केलेल्याबद्दल बोर्ला यांनी कौतुक केले आहे. नियमांनुसार लवकरच लसी भारतात देण्यात येईल असे बोर्ला यांनी म्हटले आहे. “आमच्याकडे अद्याप भारतात लस पुरवठा करण्यासाठी नियामक मान्यता नाही. लसीकरण कार्यक्रमासाठी आमची लस उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सरकारशी करार करण्यासाठी जे काही करता येईल ते करत आहोत”, असे बोर्ला यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Covid 19: चीनमधील खाण, कामगारांचा मृत्यू आणि RaBt-CoV चं रहस्य…; पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

मीरपुरी यांनी फायझरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांची माहिती दिली आहे. १ एप्रिल रोजी स्वत: साठी आणि त्याच्या कुटूंबासाठी लसीकरणाची नोंदणी केली होती. १८ मार्च रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दिवसांत, त्यांनी इंटरनेटवरुन मित्रांशी संपर्क साधून स्वत: ला व्यस्त ठेवले. अमेरिकेतील अभय नावाच्या मित्राने फायझर लस घेण्याची विनंती केली. ही लस सर्वोत्तम असल्याचे त्याने सांगितले.

अभयची आई व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांची पॅनेल सदस्य असल्याने मला लसीविषयी विश्वास असल्याचे मीरपुरी यांनी सांगितले. उपचारानंतर घरी परतल्यानंतर मीरापुरी यांनी तीन जागतिक कंपन्यांना कोविड लस भारतात उपलब्ध करुण देण्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर त्यांनी फायझर, मोर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या तीनही कंपन्यांमध्ये भागधारक होण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यासाठी त्यांनी सुमारे ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्या भागधारकाने पाठविलेल्या ईमेलला प्रतिसाद देतील अशी त्यांची खात्री होती.

लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटलांनी केला सत्कार

उत्तम वैद्यकीय आरोग्यसेवा मिळविण्यासाठी मीरपुरी यांनी याआधी देखील प्रयत्न केले आहेत. १९९९ मध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी अमेरिकेतून सर्वोत्तम औषधांची व्यवस्था केली होती. परंतु, त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. दरम्यान, मीरपुरी यांना फायझरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला असला तरी ही लस भारतात उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार आहे.