News Flash

Coronavirus: पुण्यात दिवसभरात २९३ तर पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ९२ रुग्ण

पुणे शहरात आज अखेर ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यात दिवसभरात २९३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ९२ रुग्ण आढळून आले असून दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १०,१८३ एवढी झाली, तर पिंपरी-चिंचवडमधील एकूण संख्या १,३३० वर पोहोचली आहे.

पुणे शहरात आज अखेर ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १५० रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ५६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये लोणावळा आणि दापोडी येथील रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत होते त्यांचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, आज शहरातील ५७ जण करोनामुक्त झालेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची एकूण संख्या १,३३० वर पोहचली असून आत्तापर्यंत साडेआठशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 9:22 pm

Web Title: corona virus 293 patients were found in pune and 92 in pimpri chinchwad today aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राजू शेट्टी यांची आमदारकी नक्की, शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब
2 आता मंदिरं उघडण्यासही परवानगी द्यावी; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
3 पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणातील ११ आरोपींना करोनाची लागण
Just Now!
X