नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या हल्ले करण्यात येत आहे. २०१८ मध्ये ड्रोनच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांवर हल्ला करण्यात आला होता. सध्या केमिकल हल्ले, बायोलॉजिकल हल्ले होत आहेत. त्यातच कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आले आहे. सध्या जगापुढे मोठं संटक उभं असलेला कोरोना व्हायरस हा एकप्रकारचा केमिकल हल्ला असल्याचं अजब वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभा यांच्यावतीन घेण्यात आलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उध्दव कानडे , कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महेंद्र रोकडे, रवींद्र डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिल देशमुख यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे –

हिंगणघाट सारख्या घटना रोखण्यासाठी देखील राज्य सरकार व गृहखात्याकडून आवश्यक ती बंधने आणण्यासाठी प्रयत्न करणार

राज्यात सर्वाधिक सायबर क्राईमचे गुन्हे पुण्यात घडत आहे

मुंबईत नाईट लाईफला चांगला प्रतिसाद आहे. जर पुण्यातून मागणी झाल्यास त्याचा विचार करू

मुंबई प्रमाणे पुण्यात देखील हॉर्स राईड पोलीस लवकरच राबविणार

नागपुरच्या अधिवेशनावेळी पवार साहेबांनी गृह खात देणार असल्याच सांगितल होते.

पवार यांनी महत्वाचे जबाबदारी माझ्यावर दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची काळजी घेणार आहे.