News Flash

एप्रिल महिन्यात १९०० पुणेकरांचा करोनाने मृत्यू

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून शहरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.

(संग्रहित छायाचित्र)

दुसऱ्या लाटेतील संसर्ग प्राणघातक

पुणे : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना वेठीस धरले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या लाटेतील संसर्ग प्राणघातक नाही, असे सुरुवातीला दिसत होते. मात्र, एकट्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ३०३८ रुग्ण करोनाने दगावले आहेत. त्यांपैकी १९०० रुग्ण पुणे शहरातील आहेत.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून शहरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे रुग्ण संसर्गाचा वेग लक्षणीय आहे, मात्र हे उत्परिवर्तन मारक नाही, असे निरीक्षण दुसऱ्या लाटेच्या प्राथमिक टप्प्यावर नोंदवले जात होते. सुरुवातीच्या काही काळात मृतांची संख्याही पहिल्या लाटेच्या तुलनेत कमीच राहिली.

काही दिवसांनी त्यात बदल

होऊन मृतांची संख्याही वाढण्यास सुरुवात झाली. सध्या पुणे शहरात दररोज ४० ते ५० तर संपूर्ण  जिल्ह्यात सुमारे १५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे  एप्रिल महिन्यात शहरातील १९०० तर संपूर्ण जिल्ह्यात ३०३८  रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे जिल्ह् यातील एकू ण मृतांची  संख्या १३,०७७ वर जाऊन पोहोचली आहे. त्यांपैकी ६९६६ मृत्यू पुणे शहरातील आहेत. एकू ण मृतांपैकी ४५८ रुग्ण हे परजिल्ह्यातील आहेत.

पुणे महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, दुसऱ्या लाटेत प्रामुख्याने चाळिशीच्या आतल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.  त्यामुळे या वयोगटातील  रुग्ण दगावत असल्याचेही दिसून येत आहे. रुग्णांकडून उपचार  सुरू करण्यास होणारा विलंब, दुखणे अंगावर काढण्याची वृत्ती ही  कारणे दिसत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या लाटेतील उत्परिवर्तन  फुप्फु सांमध्ये गुंतागुंत निर्माण  करत असल्यामुळे चिंतेचे कारण ठरते. त्यामुळे थकवा, घसा दुखणे, कोरडा खोकला, ताप असे कोणतेही लक्षण अंगावर न काढण्याचे आवाहन आम्ही नागरिकांना करत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:27 am

Web Title: corona virus death in april month in pune akp 94
Next Stories
1 रेमडेसिविरविना ९१ वर्षीय आजोबा करोनामुक्त
2 ‘रेमडेसिविर’ वितरण पालिकेकडे
3 खाटांची अद्ययावत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड यंत्रणा उभारावी
Just Now!
X