क्षमता असूनही लसीकरणास बंधने; केंद्राकडे लशींसाठी मागणी

पुणे : शहरासह जिल्ह्यात के वळ गुरुवारपुरताच (८ एप्रिल) लशींचा साठा शिल्लक होता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुण्यात लशींचा साठा मर्यादित असल्याने क्षमता असूनही लसीकरण करताना बंधने येत आहेत. त्यामुळे पुण्यात मागणी असेल तेवढा लशींचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केंद्रीय पथकाकडे के ली आहे.

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी ‘१०० डेज’ ही मोहीम सुरू के ली आहे. या मोहिमेंतर्गत दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन के ले आहे. ही मोहीम सोमवारपासून (५ एप्रिल) सुरू करण्यात आली असली, तरी आतापर्यंत शहरासह जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करणे शक्य झालेले नाही. प्रशासनाने दररोज ९० हजार ते एक लाखांपर्यंत लसीकरणाची तयारी के ली आहे. मात्र, लशींचा साठा मर्यादित असल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले,की सोमवारी शहरासह जिल्ह्यात ८५ हजारांएवढे लसीकरण झाले होते. मात्र, मंगळवारी आणि बुधवारी अनुक्रमे ५३ हजार आणि ५५ हजार एवढ्याच नागरिकांना लस टोचण्यात आली. अनेक केंद्रांवरील लशींचा साठा दुपारनंतर संपुष्टात येत असल्याने के ंद्रांवर आलेल्या नागरिकांना नाइलाजाने परत पाठवण्यात येत आहे. लशींचा साठा कमी असल्याने क्षमता असूनही पूर्ण क्षमतेने पुण्यात लसीकरण करता येत नसल्याची स्थिती सध्या आहे.

दरम्यान, पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे दोन जणांचे पथक सध्या पुणे दौऱ्यावर आले आहे. या पथकाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची भेट घेतली. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या पथकाकडे पुण्यातील लसीकरणाची सद्य:स्थिती सांगून जास्तीत जास्त लशींचा पुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी के ली.

 

शहरासाठी उपलब्ध झालेला लस साठा (८ एप्रिलपर्यंत)

 

’ प्राप्त साठा- ५ लाख ९७ हजार ९३०

’ वाटप झालेला साठा- ५ लाख ७ हजार ९७७

’ शिल्लक साठा- ८९ हजार ९५३

’ वाटप टक्के वारी- ८५ टक्के

’ प्रस्तावित साठा- ४१ हजार ९४७ (कोविशिल्ड-३२ हजार ४९७, कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोससाठी- ९ हजार)

’ वाया गेलेल्या मात्रा- २३ हजार ४५६ (४.४६ टक्के )

’ महापालिका शिल्लक मात्रा- २५ हजार

कॉल सेंटर क्रमांक

’ ०२०-२५५०२१०६

’ ०२०-२५५०२१०७

’ ०२०-२५५०२१०८

’ ०२०-२५५०२१०९

’ ०२०-२५५०२११०

 

’ सक्रिय रुग्ण- ४६ हजार ७१

’ गृहविलगीकरणातील संख्या- ३९ हजार

’ कोविड के अर सेंटर- ६२४

’ सरकारी रुग्णालयातील दाखल संख्या- १ हजार ७५८

’ खासगी रुग्णालयातील संख्या- ४ हजार ६८९

पुण्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर के वळ १६ केंद्रे होती. या केंद्रांमध्ये वाढ करून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून ४५० ते ५०० एवढी लसीकरण केंद्रे आहेत. लसीकरण केंद्रे अजून वाढवण्याची प्रशासनाची तयारी आहे. त्याकरिता पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र, केंद्रे वाढवली आणि लशींचा पुरेसा साठा नसल्यास नागरिकांना परत पाठवावे लागेल, म्हणून सद्य:स्थितीत केंद्रे वाढवण्यात येत नाहीत. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

कोविड लसीकरण तांत्रिक साहाय्य हेल्पलाइन क्रमांक  : ०२०२५५२११४