News Flash

बरे झाल्यानंतरही १०० दिवस काळजीचे!

करोना संसर्गादरम्यान रुग्णाला मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसली असतील तर करोना बरा झाल्यानंतरही रुग्णांना अनेक प्रकारचे त्रास होत राहण्याचा धोका असतो

गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू संसर्गाने जगाला वेठीस धरलंय. करोनापासून बचावासाठी आपण
विविध उपाय करीत आहोत. पण ‘करोना होऊन गेला’… ‘लस घेतली आहे’…या सबबीखाली पुढील काळात गाफिल राहणे कसे चुकीचे आहे, याची तपशीलवार माहिती देणारा राज्य करोना कृ ती दलातील सदस्य
डॉ. शशांक जोशी यांचा विशेष लेख…

करोनापासून बचावासाठी मुखपट्टी, अंतर आणि स्वच्छतेचे नियम आपण पाळत आहोतच, मात्र करोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. करोना संसर्ग झाला तर त्याचं वेळापत्रक दोन ते तीन आठवड्यांचं आहे. रुग्ण एवढ्या कालावधीत बरे होऊन घरी येतात. घरी आल्यानंतर बहुतांश रुग्ण करोना होण्यापूर्वीसारखं जगण्यास सुरुवात करतात. त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की करोनातून बरे झाल्यानंतर किमान ९० ते १०० दिवस रुग्णांनी आपल्या प्रकृतीची डोळ्यात तेल घालून काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

करोना संसर्गादरम्यान रुग्णाला मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसली असतील तर करोना बरा झाल्यानंतरही रुग्णांना अनेक प्रकारचे त्रास होत राहण्याचा धोका असतो. मात्र, तेवढेच नव्हे तर ज्या रुग्णांना अत्यंत सौम्य करोना होऊन गेलाय आणि गृहविलगीकरणात राहून जे रुग्ण बरे झालेत त्यांनाही असा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे करोना संसर्गादरम्यान आपल्याला कोणताही त्रास झाला नाही म्हणून नंतर गाफील राहणे योग्य नाही, हे सर्व करोनामुक्त रुग्णांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. करोनातून बरे झाल्यानंतर संतुलित आहार, विश्रांती, हलका व्यायाम, चिंतन-मनन या बाबी महत्त्वाच्या आहेत. करोनातून उठल्यानंतरही दीर्घकाळपर्यंत थकवा, मरगळ, गळून गेल्यासारखे वाटणे या गोष्टी राहतात. परदेशात त्याला लाँग कोविड असं म्हणतात. हे भारतातील रुग्णांबाबतही दिसत आहे. या रुग्णांना अनेकदा के वळ संध्याकाळच्या दरम्यान ९९-१०० पर्यंत ताप, हृदयाचे ठोके  वाढणे, छातीत धडधडणे ही लक्षणं दिसतात. तसं आढळल्यास घाबरून जाऊ नये, मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

करोनाबाबत खबरदारीबद्दल बोलताना काही सकारात्मक बाबींवर चर्चा करणंही आवश्यक आहे. अमेरिके च्या माजी राष्ट्राध्यक्षांना मिळालेले करोना प्रतिपिंडांचे इंजेक्शन भारतात वापरण्यास परवानगी मिळाली आहे. संसर्गाच्या पहिल्या तीन ते सात दिवसांत रुग्णाला ते मिळाले असता सहव्याधी असल्याने करोनाची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असलेले रुग्ण घरच्या घरी बरे होण्याचा दिलासा मिळणार आहे. मायलॅब डायग्नोस्टिक सोल्युशन या पुण्यातील कं पनीने तयार के लेल्या संचामुळे घरच्या घरी करोना चाचणी तीही परवडणाऱ्या कि मतीत करता येणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवरचा ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर तातडीने निदान होऊन उपचार सुरू होण्याची प्रक्रियाही वेगवान होणार आहे. भारतातील पहिली आरटीपीसीआर चाचणी उपलब्ध करून देण्याचे श्रेयही या मायलॅबचे आहे, त्यामुळे त्यांच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे.

युद्धानंतर युद्धजन्य परिस्थितीतील नागरिक ‘ट्रॉमा’ या आरोग्यविषयक परिस्थितीचा सामना करतात. करोना संसर्ग हे एक प्रचंड महायुद्धच आहे अशा परिस्थितीतून जग सध्या जात आहे. या काळातील ‘ट्रॉमा’ हाताळायचा असेल तर शांत आणि सकारात्मक राहून आजारांचे व्यवस्थापन करणे, डॉक्टरांशी टेलिमेडिसिनसारख्या आधुनिक माध्यमांतून संपर्क  ठेवणे आवश्यक आहे हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथिल झाले तरी करोनाचे संकट ओसरलेले नाही याचे भान ठेवून नागरिकांनी संयम राखणे आवश्यक आहे. मुखपट्टी, डॉक्टरांचा सल्ला, लसीकरण यांना प्राधान्य देत सर्वांनी सुरक्षित राहा, सकारात्मक राहा आणि काळजी घ्या!

सहव्याधींकडे दुर्लक्ष नको…

ज्यांना रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित विकार आहेत त्यांनी आपल्या हृदयरोग तज्ज्ञाशी संपर्कात राहावे. फु प्फु सांचे आरोग्य जपण्यासाठी स्टिरॉईडचा कमीत कमी वापर, श्वसनाचे व्यायाम, योग, प्राणायाम या गोष्टी नियमित करणेही महत्त्वाचे आहे. मज्जातंतूशी संबंधित गिया-बारे सिंड्रोमसारखे दुर्मिळ आजारही करोनानंतर दिसत आहेत. करोना काळात स्वादुपिंडातील बीटा पेशी निकामी होऊन मधुमेह होण्याचा धोका आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवत मधुमेह तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. करोनादरम्यान तसेच करोना बरा झाल्यावर होणारा मधुमेह ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्यांचा मधुमेह नियंत्रणाबाहेर जाणे, जे रुग्ण मधुमेह होण्याच्या काठावर (प्री-डायबेटिक) आहेत त्यांना मधुमेह होणे असे धोके  लक्षात ठेवून आहार-विहार-व्यायामावर लक्ष केंद्रित करावे. ज्या ज्या रुग्णांना करोनाबरोबरच मधुमेह, रक्तदाब, कर्क रोग, फु प्फु स विकार, हृदयरोग असे आजार आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

स्वच्छतेवर भर हवा…

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात करोनानंतर रुग्णांना काळ्या बुरशीचा संसर्ग (म्युकोरमायकोसिस) होताना दिसत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उपचारांसाठी स्टिरॉईडचा वापर आणि स्वच्छतेचा अभाव ही या संसर्गामागील मुख्य कारणे आहेत. काळ्या बुरशीबरोबरच पांढऱ्या बुरशीचा धोकाही गृहित धरून स्वच्छतेचा निकष आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग असणे हे करोनातून बरे झाल्यानंतरही महत्त्वाचे आहे.

मुखपट्टीचा विसर नको…

करोनाला दूर ठेवायचे असेल तर मुखपट्टीचा कटाक्षाने वापर करणे हे प्रमुख अस्त्र आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आपण लस घेतली म्हणून किं वा आपल्याला करोना संसर्ग होऊन गेला म्हणून मुखपट्टीचा विसर पडता कामा नये. मुखपट्टी, नवीन सूचनांप्रमाणे डबल मास्किं ग अत्यंत महत्त्वाचे आहे. स्तनदा मातांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. लवकरच गरोदर महिलांसाठीही लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक नागरिकांनी लशीचा किमान एक डोस घेतला तरी करोनापासून सुरक्षित होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल असेल, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

 

मानसिक आरोग्याला प्राध्यान्य द्या…

करोना काळातील मानसिक आरोग्य हाही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करोनावर प्रतिबंधासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांसमोर जगण्याचे प्रश्न आहेत. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्न आहेत. तसेच, करोनाची टांगती तलवारही आहेच. या काळात अधिकाधिक सकारात्मक राहणे अनिवार्य आहे. त्यासाठी नकारात्मक माहितीच्या स्रोतांपासून लांब राहणे सर्वस्वी आपल्या हातात आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. त्यासाठी गरजेप्रमाणे सर्व माहितीच्या साधनांपासून लांब राहावे, थोडक्यात डिजिटल डिटॉक्स करावे, हे उत्तम.

शब्दांकन : भक्ती बिसुरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:49 am

Web Title: corona virus infection corona test corona safe mask akp 94
Next Stories
1 सर्वाच्या लसीकरणाची घाई हीच चूक!
2 शहरासह जिल्ह्य़ात काळी बुरशीचे ४६३ रुग्ण
3 सद्य:स्थितीत बालकांची भावनिक साक्षरता महत्त्वाची!
Just Now!
X