बुधवारी दिवसभरात ८३ टक्के  लाभार्थींचे लसीकरण

पुणे : बुधवारी दिवसभरात पुणे शहरात ८३ टक्के  लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. १६ जानेवारीला करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून शहरात झालेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. शहरातील केंद्रांमध्ये को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक अडथळे कमी झाल्यामुळेही लसीकरण वाढल्याचे दिसत आहे.

पुणे महापालिके चे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती म्हणाले, बुधवारी दिवसभरात झालेले ८३ टक्के  हे आतापर्यंत शहरात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे. १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु झाली, त्यानंतर को-विन अ‍ॅपच्या वापरातील तांत्रिक त्रुटी लसीकरणात अडथळे निर्माण करत होत्या. मात्र आता को-विन अ‍ॅपमधील त्रुटी ८० टक्के  कमी झाल्या आहेत. त्यामुळे ज्या शंभर लाभार्थींना उद्या लस द्यायची आहे, त्यांना आदल्या दिवशी संदेश पाठवला जातो. त्या लाभार्थीशी दूरध्वनीद्वारे बोलून त्याला लसीकरणाबाबत माहिती दिली जाते.

प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर १०० पेक्षा कमी लाभार्थी आले असता इतर पर्यायी लाभार्थींना संपर्क साधून त्यांना लस टोचली जाते. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढत आहे, मात्र हे प्रमाण १०० टक्के  व्हावे यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही डॉ. भारती यांनी स्पष्ट के ले.

१४०३ जणांचे लसीकरण 

बुधवारी दिवसभरात १७०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन होते. त्यांपैकी १४०३ जणांचे लसीकरण करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकमध्ये १०० टक्के  लसीकरण झाले. जहांगीर रुग्णालयात ९०  टक्के , के ईएम रुग्णालयात १०१ टक्के  लसीकरण झाले. १०० लाभार्थींचे लक्ष्य असताना भारती रुग्णालयात १९२ तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात २१४ जणांचे लसीकरण झाले. ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सर्वात कमी ३९ टक्के  लसीकरण झाले.