पुणे शहरात आज(शनिवार) दिवसभरात १ हजार ६३३ करोनाबाधित वाढले असुन, १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख १६ हजार ४६३ झाली आहे. तर, आजपर्यंत ४ हजार ९३७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ६३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर २ लाख ८०३ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८११ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४८७ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १३ हजार १८१ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख ४ हजार ८५३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३०९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Corona Update : चिंताजनक! राज्यात दिवसभरात ८८ रुग्णांचा मृत्यू, तर १५ हजार ६०२ नवे करोनाबाधित!

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असुन, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आलेला आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक इशारा दिलेला आहे. आज(शनिवार) दिवसभरात राज्यात ८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.