01 June 2020

News Flash

Coronavirus : पुण्यात दिवसभरात 163 नवे पॉझिटिव्ह , 6 जणांचा मृत्यू

शहरातील करोनाबाधितांची संख्या 2 हजार 987 वर पोहचली

संग्रहित छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोना बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने आघाडीवर आहेत.  दरम्यान, आज दिवसभरात पुणे शहरात 163 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे

पुणे शहरात दिवसभरात आज 163 नवे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील करोनबाधितांची संख्या आज अखेर 2 हजार 987 इतकी संख्या झाली आहे. तर आज  6 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 169 वर पोहचली आहे. तसेच, 14 दिवसानंतर 109 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 486 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुणे विभागातही करोना विषाणूचे रुग्ण संख्या वाढत असून आज अखेर 3 हजार 849 एवढे रुग्ण विभागात आढळले आहेत. त्याच दरम्यान आतापर्यंत 203  रुग्णांचा मृत्यू झाला  असून, 1 हजार 697  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले की, पुणे जिल्हयात 3  हजार 352 रुग्ण असून 1 हजार 533 रुग्ण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण  178  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 124 रुग्ण असून 39 रुग्ण घरी सोडले आहे. तर त्याच दरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोलापूर जिल्हयात  308 रुग्ण असून 87 रुग्णांना घरी सोडले आहे. आज अखेर 21  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 41 रुग्ण असून 29 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 24 रुग्ण असून 9 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. त्याच बरोबर आज अखेर एका रुग्णांचा मृत्यू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

गेला आठवडाभर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्य़ात दररोज 100 पेक्षा अधिक करोनाग्रस्त सापडत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. तातडी नसेल तर घराबाहेर पडू नका, ज्यांना घराबाहेर पडणे अत्यावश्यक आहे, त्यांनी सर्वतोपरी खबरदारी घ्या आणि परिस्थितीचे गांभिर्य ठेवा, असे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात करोनाचे 1 हजार 602 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 27 हजार 524 इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात 44 जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. आज 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

“करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल,” असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला आहे. “अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही,” असे मायकल जे रेयान म्हणाले. रेयान हे WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 8:53 pm

Web Title: coronavirus 163 new positive 6 deaths in pune in a day msr 87 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुणे विभागात 3 हजार 849 कोरोनाबाधित, आतापर्यंत 203 रुग्णांचा मृत्यू
2 पिंपरी-चिंचवडमधून १२०० परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
3 ‘भामा-आसखेड’च्या कामासाठी सुरक्षा द्या
Just Now!
X