News Flash

Coronavirus : पुण्यात दिवसभरात १७ मृत्यू , २८८ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये २१६ नवे करोनाबाधित आढळले

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात २८८ नवे करोनाबाधित आढळले असून, १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ६० हजार ३७४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार १८० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४४१ रुग्णांची तब्येत ठीक असल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत १ लाख ५० हजार ३६० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४३६ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८७ हजार २६० असून, यापैकी ८३ हजार ८१० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८८८ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 7:47 pm

Web Title: coronavirus 17 deaths 288 new cases in pune in a day msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राजू शेट्टी पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात दाखल
2 बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने कोयत्याने…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
3 पुणे पोलिसांना पुन्हा आव्हान; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यानंतर PSI च्या नावे बनावट फेसबुक अकाउंट
Just Now!
X