पुण्यात आज दिवसभरात १ हजार ७४० नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १५ रूग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर एकुण बाधितांची संख्या २ लाख १८ हजार २०३ वर पोहचली. आजपर्यंत ४ हजार ९५२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ८५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर एकूण २ लाख १ हजार ६६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८४५ व महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील १० जण करोनाबाधित आढळले. याचबरोबर ४०३ जण करोनामुक्त झाले. तर पाच रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार २६ वर पोहचली असून, यापैकी, १ लाख ५ हजार २५६ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३१९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus : राज्यात दिवसभरात ५० मृत्यू, १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले

राज्यातील करोना संसर्ग आता झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. तर राज्यभरात निर्बंध अधिकच कठोर करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील करोना रूग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. आज(रविवार) दिवसभरात राज्यभरात १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले असुन, ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे.  आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.