पुणे शहरात दिवसभरात २ हजार ३४२ करोनाबाधित वाढले असून, १५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ३७ हजार ७३६ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ६८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज १ हजार ७८९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ९ हजार ६०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
Coronavirus – राज्यात दिवसभरात २४ हजार ६४५ करोनाबाधित वाढले, ५८ रूग्णांचा मृत्यू
राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Coronavirus – राज्यात तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न – आरोग्यमंत्री
राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील करोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 22, 2021 9:17 pm