पुण्यात दिवसभरात २ हजार ५४७ करोनाबाधित वाढले असून, २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आजअखेर २ लाख ६१ हजार ६५९ झाली आहे. तर आजपर्यंत ५ हजार २४३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज २ हजार ७७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख २३ हजार ५४१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ३१ हजार ६४३ करोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केलेली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे देखील संकेत दिलेले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर आता १.९८ टक्के इतका आहे.  राज्यात आज रोजी एकूण ३,३६,५८४  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.